शेखर सुमनच्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा… जगण्या-मरण्याचा संघर्ष, चमत्कारचा उल्लेख करताना भावूक झाला अभिनेता

अभिनेता शेखर सुमन हे गेल्या अनेक वर्षांनंतर स्क्रीनवर दिसणार आहेत. त्यांना पुन्हा एकदा पाहण्याची संधी आपल्याला संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या सीरिजमधून येणार आहे. सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या शेखर सुमन यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 10 वर्षाचा मुलगा आयुष शर्माला कसं गमावलं याविषयी सांगितलं. 

| Apr 24, 2024, 21:44 PM IST
1/7

मुलाखतीत केला खुलासा

शेखर सूमन हे सीरिजच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी मुलाखत देत असताना एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात दु:खद घटनेविषयी सांगितलं आहे. ती म्हणजे त्यांचा मुलगा आयुषच्या निधनाविषयी. 

2/7

मुलाचे निधन

शेखर सुमन यांनी नुकतीच 'सिद्धार्थ कन्नन'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की जेव्हा मी माझा मुलगा गमावला. आयुष हा तेव्हा 10 वर्षांचा होता. त्यावेळी माझं संपूर्ण आयुष्य हे उद्धवस्त झालं होतं. 

3/7

जगायची इच्छा नव्हती

माझी जिवंत राहण्याची इच्छा राहिली नव्हती. माझ्या काळजाता तुकडाच माझ्यापासून हिरावला गेला होता. त्यावेळी मी अक्षरश: जमिनीवर डोकं आपटून रडलो होतो. 

4/7

काम करायची इच्छा नव्हती

"माझ्यात काम करण्याची, पैसे कमावण्याचीही इच्छा नव्हती. चित्रपटसृष्टीतील यश-अपयशाचीही मला काळजी नव्हती. इथे मी नुसतंच हसायचो किंवा आर्थिक गरज म्हणून काम करायच होतं कारण घर चालवायचं होतं." 

5/7

पंडितांनी केला होता खुलासा

"माझ्या मुलाच्या निधनानंतर मी अनेक पंडितांना जाऊन भेटलो आणि विचारलं की असं का होतंय? तेव्हा ते म्हणाले की तुमचा मुलगा तुम्हाला एकदा नक्की भेटेल. 2009 मध्ये जेव्हा बिहारमध्ये मी प्रचार रॅलीत सहभागी झालो होतो."

6/7

पत्नीसोबत घडला धक्कादायक प्रकार

'माझी पत्नी काशी विश्वनाथला गेली होती. त्यावेळी तिचा मला फोन आला आणि तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रकार तिनं मला सांगितला,' असं शेखर यांनी सांगितलं. 

7/7

शेखर सुमन यांच्या पत्नीला आला अनुभव

शेखर यांची पत्नी जेव्हा कारमध्ये बसली तेव्हा एक मुलगा तिथे आला आणि त्यांच्याकडे पैसे मागू लागला. त्यांनी त्या मुलाला पाहिलं तर तो त्यांना त्यांचा मुलगा आयुषसारखा दिसत होतो. त्याला पैसे दिले तर तो म्हणाला, यात माझं काय होणार?' हेच वाक्य त्यांचा मुलगा आजारी असताना बोलायचा. हे वाक्य ऐकल्यानंतर त्यांची पत्नी बेशुद्ध झाली आणि जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा तिथे कोणीही नव्हतं,असं शेखर यांनी सांगितलं.