शिवसेना-भाजपमध्ये सर्वाधिक घराणेशाही! पत्नी, मुलगा, मुलगी आणि... 33 उमेदवार घरातील

या निवडणुकीत एक मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे घराणेशाहीचा.. मात्र राज्यात सर्वच पक्षांनी भरभरुन घराणेशाहीतीलच उमेदवार दिलेत..

May 04, 2024, 00:01 AM IST

Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणूक प्रचारात घराणेशाहीचे दररोज आरोप होतायत. सर्व पक्षांचे 48 च्या 48 उमेदवार जाहीर झालेत.. मात्र धक्कादायक म्हणजे सर्वपक्षीय उमेदवारांमध्ये यंदा घराणेशाहीचाच बोलबोला दिसतोय. जवळपास 34 % उमेदवार घराणेशाहीतील आहेत, सर्वाधिक शिवसेना आणि भाजपनं नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिलीयत. शिवसेनेचे 50% तर भाजपचे 46% उमेदवार घराणेशाहीतून येतात..33 उमेदवार हे  राज्यातल्या घराणेशाहीत आलेत. 

1/18

 बीड - पंकजा मुंडे - दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या कन्या

2/18

रावेर - रक्षा खडसे - एकनाथ खडसेंच्या सून

3/18

अकोला -अनुप धोत्रे - माजी खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र  

4/18

दक्षिण मुंबई - यामिनी जाधव - यशवंत जाधव यांच्या पत्नी

5/18

कल्याण - श्रीकांत शिंदे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र

6/18

हातकणंगले - धैर्यशील माने - माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र

7/18

यवतमाळ-वाशिम - राजश्री पाटील - खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी

8/18

मुंबई उत्तर पश्चिम - अमोल किर्तीकर - खासदार गजानन किर्तीकरांचे पुत्र

9/18

हातकणंगले - सत्यजित पाटील - माजी आमदार बाबासाहेब पाटील यांचे पुत्र

10/18

उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर - पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र  

11/18

उस्मानाबाद - अर्चना पाटील - माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्या सून

12/18

बारामती - सुनेत्रा पवार - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी  

13/18

माढा - धैर्यशील मोहिते-पाटील - माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र

14/18

बारामती - सुप्रिया सुळे- शरद पवार यांच्या कन्या

15/18

वर्धा - अमर काळे -आमदार अनिल देशमुख यांचे भाचे

16/18

उत्तर मध्य मुंबई - वर्षा गायकवाड - दिवंगत खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या

17/18

सोलापूर - प्रणिती शिंदे - सुशीलकुमार शिंदेंच्या कन्या  

18/18

चंद्रपूर - प्रतिभा धानोरकर - दिवंगत खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी