सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात धडक कारवाई, मुंबई पोलिसांच्या हाती मोठं यश

Salman Khan House Firing : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी  कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी बिहारमधून पाच तरुणांना अटक केली आहे. 

राजीव कासले | Updated: Apr 24, 2024, 05:21 PM IST
सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात धडक कारवाई, मुंबई पोलिसांच्या हाती मोठं यश title=

Salman Khan House Firing : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतल्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात दररोज नवनवे माहिती समोर येत आहे. आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. बिहारमझल्या (Bihar) पश्चिम चंपारण इथून मुंबई पोलिसांनी पाच तरुणांना अटक केली आहे. हे तरुण लॉरेन्स बिष्णोई गँगशी (Lawrence Bishnoi Gang) जोडले गेल्याचा मुंबई पोलिसांना (Mumbai Police) संशय आहे. मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांच्या पथकाने गौनाहा पोलीस क्षेत्रातील मसही गावात धडक मारली आणि थेट कारवाई सुरु केली. या गावातून पोलिसांनी आशीष, अंकित या दोघांसह आणखी तीन तरुणांना अटक केली. या पाचही तरुणांनी चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आलं आहे. 

सलमानच्या घरावर गोळीबार
14 एप्रिलच्या रात्री सलमाना खानच्या मु्ंबईतल्या वांद्रे इथल्य गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करण्यात आला. बाईकवरुन आलेल्या विक्री आणि सागर या दोन आरोपींनी हा गोळीबार केला. यावेळी विक्री आणि सागर अंकित आणि आशीषबरोबर मोबाईलच्या माध्यमातून संपर्कात होते. अंकित आणि आशीष यांना याप्रकरणात गावातील आणखी तीन तरुणांनी मदत केली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

तापी नदीतून दोन पिस्तून जप्त
त्याआधी मुंबई पोलिसांनी सूरतमधल्या तापी नदीतून जवळपास 30 तासांच्या सर्च ऑपरेशननंतर 2 पिस्तूल आणि 4 काडतूसं जप्त केली. मुंबई पोलील दलातील एनकाऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वाखाली हे सर्च ऑफरेशन राबवण्या आलं होतं. गोळीबार गेल्यानंतर आरोपी विक्की आणि सागरने पिस्तूल आणि काडतूसं सूरतमधल्या तापी नदीत फेकून दिली. पोलिसांनी नदीत जवळपास 365 मीटर खोल तपास केला. गोळीबार केल्यानंतर आरोपी विक्की आणि सागर यांनी गुजरातला पळ काढला. पोलिसांनी त्यांना गुजरातमधल्या भूजमधल्या एका मंदिरातून अटक केली. त्यांची बाईकही जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विक्की आणि सागर हे दोघं बिहारमधल्या चंपारणमध्ये पिस्तूल चालवण्याचा सराव करत होता. गोळीबार करण्याच्या काही तास आधी म्हणजे 13 एप्रिलला या दोघांना पिस्तूल आणि काडतूसं पुरवण्यात आली होती. 

सलमानच्या खाच्या गॅलेक्स अपार्टमेंटबाहेर 14 एप्रिललच्या पहाटे 4.50 वाजता बाईकवरुन आलेल्या दोन आरोपींनी पाच राऊंड फायर केले होते. एक गोळी सलमान खानच्या गॅलरीच्या नेटवरह आदळली. याच गॅलरीतून सलमान आपल्या चाहत्यांना अभिवादन करतो.