Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

25 Apr 2024, 20:02 वाजता

उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

 

Varsha Gaikwad : उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केलीय... वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि धारावीच्या विद्यमान आमदार आहेत. आता उत्तर मध्य मुंबईतून त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील... या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाई जगताप देखील इच्छुक होते. मात्र त्यांच्याऐवजी उमेदवारीची माळ गायकवाडांच्या गळ्यात पडलीय... दरम्यान, महायुतीचा उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार अजून ठरलेला नाही... विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याऐवजी अन्य पर्यायांचा भाजप नेते विचार करत असल्याचं समजतंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Apr 2024, 19:15 वाजता

राजू शेट्टींचा मुख्यमंत्री शिंदेंवर संताप व्यक्त

 

Raju Shetty On Eknath Shinde : राजू शेट्टींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर संताप व्यक्त केलाय. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांन नोटिसा दिल्या जातात. आम्ही दहशतवादी, नक्षलवादी की दरोडेखोर आहोत का, असा सवाल राजू शेट्टींनी शिंदेंना विचारलाय. एवढी भीती असेल तर त्यांनी थकीत ऊसदराच्या आंदोलनामध्ये मध्यस्थी का केली? असा देखील सवाल शेट्टींनी केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Apr 2024, 17:03 वाजता

राहुल गांधी अमेठीतून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून लढणार?

 

Loksabha Election 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी उत्तर प्रदेशातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... येत्या शनिवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणाराय... उद्या वायनाडमध्ये दुस-या टप्प्यात निवडणूक होतेय. तिथलं मतदान पार पडल्यानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा अमेठीतून उमेदवारी अर्ज भरतील, अशी चर्चा आहे. तर सोनिया गांधींच्या रायबरेली मतदारसंघातून आता प्रियंका गांधी मैदानात उतरणार असल्याचं समजतंय... विशेष म्हणजे अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेऊन हे दोघे भाऊ-बहिण १ ते ३ मेच्या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.. गेल्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघात स्मृती ईराणी यांनी राहुल गांधींना हरवलं होतं. तर केरळच्या वायनाडमधून राहुल गांधी खासदार झाले होते. आता यंदाही ते दोन्ही ठिकाणाहून लढणार असल्याचं समजतंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Apr 2024, 16:34 वाजता

सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकणात खुलासा

 

Salman Khan : सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा आला आहे. सलमानच्या घरावर आरोपींना 40 राऊंड फायर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आरोपींनी पाचच गोळ्या झाडल्या. त्यांच्याकडून 17 राऊंड जप्त करण्यात आल्या असून, इतर राऊंडचा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तसंच पोलिसांना चकवण्यासाठी आरोपी पळताना सतत कपडे बदलत होते, असंही तपासात समोर आलंय. त्यांना राजस्थान, बिहार, हरयाणातून मदत पुरवण्यात आली होती. पोलीस त्या मदत करणा-यांनाही शोधत आहेत. दरम्यान गोळीबार प्रकरणी पकडलेल्या दोघांना 29 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Apr 2024, 16:01 वाजता

विश्वजित कदमांचा ठाकरे गटाचा इशारा

 

Sangli Vishwajeet Kadam : सांगलीची जागा काँग्रेसला न मिळाल्याने विश्वजित कदमांनी मेळाव्यात आक्रमक भूमिका मांडली... उद्धव ठाकरे अचानक आले आणि उमेदवारी जाहीर केली...मविआत कोण काय करत होते यावर बारीक लक्ष नव्हते का? असा सवाल विचारत जागा सोडणं हे चुकीचंच होतं अशी खंत त्यांनी बोलून दाखवलं...मित्र पक्षाला सांगा 100 टक्के काँग्रेसची मते मिळतील...पण पुढे विधानसभेला आवाज काढायचा नाही...जागा न मिळाल्याचा वचपा येणा-या काळात काढूच असा इशारा विश्वजित कदमांनी ठाकरे गटाला दिलाय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Apr 2024, 15:58 वाजता

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

 

Eknath Shinde On Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची जुनी व्हिडिओ क्लिप दाखवत घणाघाती टीका केलीय.. उद्धव ठाकरे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान गात होते त्याची क्लिप मुख्यमंत्र्यांनी ऐकवली... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची जुनी व्हिडिओ क्लिप दाखवत घणाघाती टीका केलीय.. उद्धव ठाकरे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान गात होते त्याची क्लिप मुख्यमंत्र्यांनी ऐकवली... सरडे रंग बदलतात मात्र इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा राज्याने पाहिला नसल्याची टीका शिंदेंनी केलीय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

25 Apr 2024, 14:24 वाजता

'रावण आता आमच्या उरावर बसलाय', शहाजी पाटलांची मोहिते पाटलांवर टीका

 

 

Shahajibapu Patil : सांगोल्यात आमदार शहाजी पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटलांचा चांगलाच समाचार घेतलाय. रामाने रावणाला लंकेत मारला... मात्र रावणाचा आत्मा भटकत अकलूजमध्ये येऊन पडला. हे रावणं आता आमच्या उरावर बसलेत, अशा शब्दांत शहाजी पाटलांनी अकलूजच्या मोहिते पाटलांवर निशाणा साधलाय.

 

25 Apr 2024, 13:34 वाजता

 'भुजबळांची अवहेलना होत असल्यानं काळजी वाटतेय', जयंत पाटलांचा टोला

 

Jayant Patil On Chhagan Bhujbal : शरद पवार गटाकडून छगन भुजबळांशी चर्चा सुरू असल्याच्या प्रश्नावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिलीय...भुजबळांची तिकडे प्रचंड अवहेलना झालीय...त्यांना आधी नाशिकमधून उमेदवारी देणार होते...नंतर दिली नाही...त्यांची अवहेलना होत असल्याने काळजी वाटतेय असा टोला जयंत पाटलांनी लगावलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

25 Apr 2024, 13:16 वाजता

पंतप्रधान मोदी, राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस

 

निवडणूक आयोगाकडून पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींना नोटीस पाठवण्यात आलीय...आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन्ही नेत्यांना नोटीस पाठवण्यात आलीय...29 एप्रिलला सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर निवडणूक आयोगाने मागवलंय...भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी धर्म, जात, समुदाय यांच्या फूट पाडल्याचा आरोप करण्यात आला होता..त्याप्रकरणी आयोगाने नोटीस पाठवली असून, नोटीसीला उत्तर मागवलंय...

25 Apr 2024, 12:40 वाजता

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठवली

 

Ethanol : इथेनॉल निर्मितीबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय...इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठवण्यात आलीय...या निर्णयामुळे 38 कोटी लीटर इथेनॉलची निर्मिती वाढणार आहे...बी हेवी मोलॅसिसच्या स्टॉकपासून इथेनॉल करण्यास डिसेंबर 2023 रोजी बंदी घालण्यात आली होती...मात्र, आता तो निर्णय बदलण्यात आलाय...मोलॅसिसच्या स्टॉकपासून इथेनॉल परिवर्तित करण्यास मान्यता देण्यात आलीय...त्यामुळे कारखानदारांसह शेतक-यांनाही याचा फायदा होणार आहे...