SRK as Don: रणवीर सिंगवर टीका होत असतानाच पुन्हा 'डॉन' साकारणार शाहरुख खान!

Shah Rukh Khan Don : एकीकडे रणवीर सिंगची चर्चा सुरु असताना आता शाहरुख खान साकारणार डॉन भूमिका... लवकरच दिसणार या चित्रपटात 

दिक्षा पाटील | Updated: Apr 24, 2024, 04:36 PM IST
SRK as Don: रणवीर सिंगवर टीका होत असतानाच पुन्हा 'डॉन' साकारणार शाहरुख खान! title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh Khan Don : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा किंग खान आहे. शाहरुख खानच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून 'डॉन 3' हा चित्रपटाविषयी चर्चा सुरु होत्या. मात्र, त्यात शाहरुख खान हा डॉनच्या भूमिकेत दिसणार नाही. तर या चित्रपटात डॉनच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे. किंग खानच्या या आयकॉनिक भूमिकेला रणवीर एका वेगळ्या अंदाजात घेऊन येणार आहे. जर तुम्हाला शाहरुखला या चित्रपटात डॉन या भूमिकेत पाहायला मिळणार नाही. तर दुसरीकडे शाहरुखला या भूमिकेत पाहण्याची एक वेगळी संधी समोर आली आहे. 

शाहरुख पुन्हा होणार डॉन!

रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान पुन्हा एकदा डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. पण 'डॉन 3' मध्ये नाही तर दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये, पिंकव्हिलाच्या रिपोर्ट्नुसार, अशी चर्चा सुरु आहे की सुहाना खानसोबत दिसणार आहे. सुहानाच्या 'किंग' या चित्रपटात शाहरुख खान डॉनची भूमिका साकारणार आहे. त्यासोबत या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद आणि सुजॉय घोष करणार असल्याचे म्हटले जात आहे. एका रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आणि सुजॉयसोबत शाहरुख खान स्वत: चित्रपटाच्या सगळ्याच गोष्टींसाठी मेहनत घेतो. तर ते तिघं मिळून या चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहेत. या तिघांनी मिळून शाहरुखसाठी एक कूल आणि स्वॅग असलेली भूमिका तयार केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, अशी देखील माहिती समोर येत आहे की या चित्रपटाचं नावं 'किंग' यासाठी ठरवण्यात आलं कारण शाहरुख खानची भूमिका ही 'अंडरवर्ल्डच्या किंग' ची असणार आहे. असं म्हटलं जातं की सुहाना खानच्या या चित्रपटात शाहरुख कान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असेल पण त्याचा ही भूमिका मोठ्या काळासाठी असेल. काही रिपोर्ट्समध्ये असं बोलण्यात आलं की हा एक मोठा प्रोजेक्ट असणार आहे. रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे किंगचं बजेट हे 200 कोटींचं असणार आहे. तर हा चित्रपट अॅक्शनपॅक असणार आहे. 

हेही वाचा : 'राजकारणी पैसे खातात हे सर्वांना माहिती, हा सिस्टिमचाच भाग'; अवधुत गुप्तेचं स्फोटक विधान

शाहरुख  आणि सुहाना या चित्रपटावर बऱ्याच काळापासून काम करत आहेत. दरम्यान, अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचं शूट यंदाच्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुरु होणार आहे. तर हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.