Bajaj ची कमाल! ना पेट्रोल, ना इलेक्ट्रिक; आणणार हायड्रोजनवर चालणारी स्कूटर

देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपन्यांपैकी एक असणारी बजाज ऑटोने नुकतंच पहिली CNG बाईक लाँच करण्याची घोषणा केली होती.

आता कंपनीने चेतक टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या सोबतीने एका नव्या इंधन पर्यायावर विचार करत असल्याचं सांगितलं आहे.

म्हणजेच बजाज ऑटो चेतक ब्रँडच्या अंतर्गत एका हायड्रोजन पॉवर वाहनावर काम करत आहे.

सध्या देशात कोणतीही वाहन निर्माता कंपनी वाहनांमध्ये हायड्रोजन तंत्रज्ञानाचा वापर करत नाही आहे.

जर बजाजने बाजारपेठेत हायड्रोजनवर धावणारं वाहन आणलं, तर देशातील पहिली कंपनी ठरेल.

हायड्रोजन वाहनाला फ्यूएल सेल व्हेईकलही म्हणतात. हे कॉम्प्रेस्ड हायड्रोजन गॅसवर चालतं. गॅसला फ्यूएल सेल स्टँकमध्ये टाकलं जातं.

हा गॅस इंधनाच्या केमिकल एनर्जीला इलेक्र्टिकल एनर्जीत रुपांतरित करतात. यामुळे वीजनिर्मिती होते, ज्यावर वाहन धावतं.

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही अनेकदा हायड्रोजन वाहनांसाठी आवाहन केलं आहे. ते स्वत: हायड्रोजनवर धावणारी टोयोटा मिराई चालवतात.

नुकतंच कावासाकीने आपली हायड्रोजन पॉवर्ड बाईक 'Ninja H2 HySE' चं अनावरण केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story