अक्षय्य तृतीयेला घराच्या मुख्य दारात लावा 'या' गोष्टी, लक्ष्मीचा राहील कायम वास

आर्थिक चणचण जाणवत असेल तर वास्तूशास्त्रानुसार काही उपाय सांगण्यात आलंय. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर घराच्या मुख्य दरवाज्यावर काही गोष्टी लावा. यामुळे लक्ष्मीचा कायम वास राहिल.

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य दारावर हळद आणि कुंकुमपासून बनवलेले स्वस्तिक लावल्यास वास्तू दोष दूर होतात, अशी मान्यता आहे.

वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी घराच्या दरवाजासमोर स्वच्छता ठेवा आणि सकाळ संध्याकाळी दिवा लावा. यामुळे आर्थिक स्थिती सुधारते.

घरात कायम संकट येत असेल तर दारावर स्वस्तिक किंवा पिरॅमिड लावावं.

कवडी हे देवी लक्ष्मीचे प्रतीक असून घराच्या मुख्य दरवाजावर 5 किंवा 9 कवडी टांगल्यास घरात सकारात्मक ऊर्जाचा वास राहतो.

वास्तूशास्त्रात घोड्याची नाल अतिशय शुभ मानली जाते.ती घराच्या मुख्य दरवाजावर लावल्यास आर्थिक स्थिती सुधारते. नकारात्मक शक्तीपासूनही बचाव होतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story