लडाख नव्हे, त्याहून सुंदर अशा भारतातील 'या' ठिकाणाला फिरस्त्यांची पसंती; भटकंतीसाठी उत्तम पर्याय

Travel News : बरं यात आणखी एक गटही येतो बरं. तो गट म्हणजे समुद्रप्रेमी आणि पर्वतप्रेमींचा. डोंगररांगा, वळणवाटा आणि शहरी धकाधकीपासून दूरवरच्या प्रदेशाला भेट देणाची तुमचीही इच्छा आहे? मग हा पर्याय देईल तुमच्या भटकंतीला खरी रंगत. 

May 06, 2024, 14:58 PM IST

Travel News : दहा- बारा दिवसांची मोठी सुट्टी मिळाली, की नेमकं जायचं कुठं असा अनेकांचा प्रश्न असतो. काही मंडळी भटकंतीसाठी जाण्याचं ठिकाण निवडूनच मग प्रवास सुरु करतात. यामध्ये तुम्ही कोणत्या गटात येता? 

1/8

साचेबद्ध ठिकाणांपलिकडे

travel sikkim witnessed highest number of tourists in 2024 best places to visit

Travel News : पर्वतप्रेमींसाठी साचेबद्ध ठिकाणांपलिकडे जाऊनही आता अशी काही ठिकाणं समोर येत आहेत जिथं फिरत असताना क्षणोक्षणी भान हरपून जाईल. एकाहून एक सरस असे सृष्टीसौंदर्याचे नमुने दाखवणारा हा प्रदेश लडाख, हिमाचल नसून हे ठिकाण आहे सिक्कीम.   

2/8

सर्वाधिक पर्यटक

travel sikkim witnessed highest number of tourists in 2024 best places to visit

पर्यटन आणि नागरी उड्डाण विभागाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार 2024 या वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिली.   

3/8

पर्यटकांचा आकडा

travel sikkim witnessed highest number of tourists in 2024 best places to visit

फक्त भारतीय नव्हे, तर परदेशी पर्यटकांनीसुद्धा सिक्कीमला भेट दिली. अनुक्रमे हा आकडा 256,537 भारतीय आणि 30,864 परदेशी पर्यटक असा होता. 

4/8

अर्थव्यवस्थेला धक्का

travel sikkim witnessed highest number of tourists in 2024 best places to visit

2023 च्या पुरानंतर सिक्कीमच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला धक्का लागला होता. पण, आता मात्र इथं परिस्थिती पूर्ववत होताना दिसत आहे. पर्यटकांचा हा ओघ लक्षात घेता 2024 या वर्षअखेरीस भारतात 12 लाख पर्यटक भेट देतील असा अंदाज लावला जात आहे.   

5/8

सोयीसुविधांची व्यवस्था

travel sikkim witnessed highest number of tourists in 2024 best places to visit

हिमालयाच्या पर्वतरांगांपैकी एका भागावर ट्रेकिंग करण्यापासून इथं आसमंतातून झेपावत पॅराग्लायडिंगचा आनंद घेण्याचा अनेक पर्यटकांची पसंती आहे. सिक्कीमची राजधानी असणाऱ्या गंगटोकमध्येही पर्यटकांच्या दृष्टीनं अनेक सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.   

6/8

लाचुंग

travel sikkim witnessed highest number of tourists in 2024 best places to visit

गंगटोक आणि सिक्कीमव्यतिरिक्त तुम्ही इथं लाचुंगला भेट देऊ शकता. हे एक असं सुरेख गाव आहे जिथून हिमालयाचं नेत्रदीपक दृश्य पाहता येतं. शिवाय लाचुंगमधील दरीखोरं, ओढे, जंगल आणि निसर्गसौंदर्य मन मोहणारं असंच आहे.   

7/8

युमथांग खोरं

travel sikkim witnessed highest number of tourists in 2024 best places to visit

सिक्कीममधील 'फुलों की घाटी' म्हणून युमथांग खोरं कमालीचं प्रसिद्ध आहे. गंगटोकपासून हे ठिकाण साधारण 148 किमी अंतरावर आहे. असं म्हणतात की हे सिक्कीममधील सर्वात सुंदर खोरं आहे. हिमालयातील पर्वतांवर असणारी अनेक प्रजातींची फुलं इथं पाहायला मिळतात. 

8/8

लाचेन

travel sikkim witnessed highest number of tourists in 2024 best places to visit

लाचुंगप्रमाणंच सिक्कीममधील आणखी एक सुरेख गाव म्हणजे लाचेन. बांबापासून तयार करण्यात आलेली घरं या ठिकाणाला आणखी महत्त्वं देऊन जातात. येथील संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांच्या मनाचा ठाव घेतात. थोडक्यात लडाखला थोडं दूर सारून एकदा सिक्कीम फिरून याच!