Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

24 Apr 2024, 09:43 वाजता

 '2016मध्येच भाजपसोबत सत्तास्थापनेचा आदेश होता', सुनील तटकरेंचा शरद पवारांबाबत गौप्यस्फोट 

 

Sunil Tatkare on Sharad Pawar : सुनील तटकरेंनी शरद पवारांबद्दल मोठा गौप्यस्फोट केलाय... 2016मध्येच भाजपसोबत सत्तास्थापनेचा आदेश देण्यात आला होता... मंत्रिपदं ठरली, खातेवाटप झालं.. लोकसभेच्या जागाही ठरल्या होत्या असा दावा तटकरेंनी केलाय.. पाहुयात तटकरे काय म्हणालेत.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

24 Apr 2024, 09:03 वाजता

सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा

 

Sunetra Pawar : निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा मिळालाय.. कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सुनेत्रा पवारांना क्लिनचीट दिलीये.. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांनी जय अॅग्रोटेकच्या संचालक पदाचा 2 वर्षापूर्वी म्हणजेच २०१० रोजी राजीनामा दिला होता.. त्यानंतर ईडीने अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर कारखान्या संदर्भात मनीलॉड्रींगचे आरोप केले होते.. बँकेला कोणतही आर्थिक नुकसान झालं नसल्याचंही EWO ने म्हटलं आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 1 हजार 343.41 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचा दावाही EWO ने क्लोजर रिपोर्टमधून केलाय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

24 Apr 2024, 08:38 वाजता

'...राणा दाम्पत्याचा पोलिसांवर दबाव होता',बच्चू कडूंचा गंभीर आरोप

 

Bacchu Kadu : अमरावतीच्या सायन्स स्कोर मैदानावरील सभेची परवानगी नाकारल्याने बच्चू कडू आक्रमक झालेयत...यावेळी राणा दाम्पत्यावर कडूंनी जोरदार प्रहार केलाय...मैदानाची परवानगी असतानाही सभेला मैदान नाकारलं...त्यामुळे रवी राणा हे भाजपचे संस्कार पायदळी तुडवत असून पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोप केलाय...तर आम्ही रात्री सभास्थळी थांबलो असतो तर राणांनी मंडप पेटवला असताना असा आरोप कडूंनी केलाय...आज कडू अमरावतीत शांततेत रॅली काढणार आहेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

24 Apr 2024, 08:07 वाजता

नांदेडमध्ये उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद

 

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद होणार आहे...सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरेंची नांदेडमध्ये पत्रकार परिषद होणार आहे...यावेळी नांदेडचे मविआचे उमेदवार वसंत चव्हाण उपस्थित राहणार आहेत...तर यानंतर उद्धव ठाकरेंची हिंगोलीमध्ये सभा होणार आहे...हिंगोलीत मविआचे नागेश पाटील हे उमेदवार आहेत...त्यांच्यासाठी ठाकरेंची सभा दुपारी 12 वाजता होणाराय...

24 Apr 2024, 07:39 वाजता

बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे आज अर्ज भरणार

 

Pankaja Munde : मराठवाड्यातील हायहोल्टेज लोकसभा मतदारसंघ असलेल्या बीडच्या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. इथं भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध मविआचे बजरंग सोनावणे अशी लढत होतेय. पंकजा मुंडे आज आपला अर्ज दाखल करणारेत. त्याआधी मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात येणारेय. अर्ज भरल्यानंतर माने कॉम्प्लेक्स शेजारी असलेल्या पारस मैदानामध्ये त्यांची जाहीर सभा होणारेय. यावेळी त्या काय बोलणार याकडे लक्ष असेल.

24 Apr 2024, 07:38 वाजता

राहुल गांधींची आज अमरावती, सोलापुरात सभा

 

Rahul Gandhi : अमरावतीत आज अमित शाहा आणि राहुल गांधींची सभा होणार आहे...दुस-या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे...त्यामुळे अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारासाठी अमित शाहांची सभा होतेय...अमरावतीच्या सायन्स स्कोर मैदानावर दुपारी 12 वाजता सभा होणाराय...तर याच मैदानावर बच्चू कडू हे सुद्धा सभा घेण्यासाठी ठाम आहेत...तर दुसरीकडे मविआच्या बळवंत वानखडेंसाठी राहुल गांधींची परतवाडामध्ये सभा होणार आहे...