Action of Election Teams : रत्नागिरी-सिंधुदुर्गात निवडणूक पथकाची मोठी कारवाई.

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Action of Election Teams : रत्नागिरी-सिंधुदुर्गात निवडणूक पथकाची मोठी कारवाई.

6 May 2024, 22:09 वाजता

धुळ्यात 55 लाखांची रोकड जप्त

 

Dhule Cash : धुळे शहरातील आग्रा रोड वर मुख्य बाजारपेठेमध्ये 55 लाख रुपयांचे रोकड जप्त...एका कापड व्यापाऱ्याकडे रोकड जप्त...निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले कारवाई...स्थानिक गुन्हे विभागाची कारवाई... 3 संशयित ताब्यात... इनकम टॅक्स विभाग करणार तपासणी...तोवर नोटा ट्रेझरी बँकेमध्ये असणार जप्त...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

6 May 2024, 21:14 वाजता

'उज्ज्वल निकमांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा', निवृत्त IPS अधिकारी मुश्रीफांची मागणी

 

S. M. Mushrif on Ujjwal Nikam : हू किल्ड करकरे या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता आणखीच चिघळलाय... 26/11 चा दहशतवादी हल्ल्याचा खटला चालवणारे तत्कालिन सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी निवृत्त पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांनी केलीय... त्यांनीच हू किल्ड करकरे हे वादग्रस्त पुस्तक लिहिलंय. निकम आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यावेळच्या शासनाची आणि कोर्टाची दिशाभूल केली, असा दावाही मुश्रीफांनी केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

6 May 2024, 20:20 वाजता

8 मेपासून शरद पवार पुन्हा मैदानात

 

Sharad Pawar : प्रकृती अस्वस्थमुळे ब्रेक घेतलेल्या शरद पवारांचा पुन्हा झंजावाती दौरा सुरू होणारेय. आठ तारखेपासून शरद पवार अहमदनगर, पुणे, सातारा, बीडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या मतदान केल्यानंतर ते प्रचाराचा धडाका लावणार आहेत. उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतील. काल प्रकृती बिघडल्यानंतर पवारांनी ब्रेक घेतला होता.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

6 May 2024, 19:37 वाजता

रत्नागिरी-सिंधुदुर्गात 3 कोटींची रोकड आणि मोठ्या प्रमाणात दारू जप्त

 

Action of Election Teams : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात विविध ठिकाणाहून 3 कोटींची रोकड आणि मोठ्या प्रमाणात दारू जप्त.. निवडणूक पथकाची रत्नागिरी - सिंधुदूर्गात मोठी कारवाई... 30 लाखांचं अमली पदार्थ देखील जप्त..

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

6 May 2024, 18:11 वाजता

'नाशिकमध्ये भूसंपादनाच्या नावाखाली 800 कोटींचा घोटाळा', संजय राऊतांचा आरोप

 

Sanjay Raut : नाशिकमध्ये भूसंपादनाच्या नावाखाली 800 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केलाय...मर्जीतल्या बिल्डरांच्या माध्यमातून 800 कोटींचा गैरव्यवहार झाला असून, हे सगळे बिल्डर मिंदे आणि कंपनीचे खास हस्तक आहेत असा आरोप राऊतांनी केलाय...बिल्डरांना भूसंपादनाच्या नावाखाली आठशे कोटी रुपयांची कशी खैरात केली याचा खुलासा करणार असल्याचा इशारा राऊतांनी दिलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

6 May 2024, 17:33 वाजता

'पंतप्रधान मोदींनी राजीनामा देऊन फिरावं', नाना पटोलेंचं मोदींना आव्हान

 

Nana Patole on PM Modi : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पंतप्रधा मोदींवर घणाघात केलाय. पंतप्रधान मोदींनी गल्लोगल्ली फिरणं त्यांना शोभत नाही..राजीनामा देऊन त्यांनी फिरावं अशी टीका पटोलेंनी केलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

6 May 2024, 16:13 वाजता

सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती

 

Supriya Sule :  सुप्रिया सुळेंकडून बारामती लोकसभा मतदारसंघातील ४ विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदान इन कॅमेरा घेण्याची निवडणूक आयोगाला विनंती...चार मतदारसंघ अतिसंवेदनशील असल्याचा दावा...सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती...बारामती, दौंड, इंदापूर, खडकवासला या ४ विधानसभा मतदारसंघात गैरप्रकार होण्याची शक्यता केली व्यक्त...निवडणूक आयोगाकडून पोलीस सदर प्रकरणी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

6 May 2024, 15:25 वाजता

मुंबईतील खारदांडामध्ये ठाकरे पक्ष-महायुतीचे कार्यकर्ते आपसात भिडले

 

Khardanda Politics : खारदांडा इथे भाजपच्या प्रचार रॅलीत ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आपसात भिडले...खारदांडा वार्ड नंबर 99 मध्ये घटना, शाखाप्रमुख चिंतामणी निवटे यांनी घोषणा दिल्याने वाद…आशिष शेलार, ऊज्वल निकम आणि माजी नगरसेवक संजय अगलदरे यांच्या समोरच घडला प्रकार...आशिष शेलार यांनी मध्यस्थी केल्याने टळला प्रकार...कार्यकर्ते शाखेत धुसण्याचा प्रयत्न करू लागल्याने पोलिसांनी केला हस्तक्षेप…काही काळ तणावाचं वातावरण 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

6 May 2024, 14:12 वाजता

दिंडोरीतून जे.पी.गावित यांची माघार

 

Dindori J.P.Gavit : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जे. पी गावित यांनी अखेर माघार घेतलीय...जे.पी.गावितांनी माघार घेतल्याने मविआला दिलासा मिळालाय...माघार घेताच गावितांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय...दिंडोरीतून महायुतीच्या भारती पवारांविरोधात मविआचे भास्कर भगरेंची लढत होतेय...जे.पी.गावित यांनी पाठिंबा दिल्याने भगरेंना बळ मिळालंय...

6 May 2024, 13:01 वाजता

गोडसेंनी 10 वर्षांत काहीच काम केलं नाही, भाजप कार्यकर्त्याची उघड नाराजी

 

Loksabha Election 2024 : हेमंत गोडसेंनी 10 वर्ष काहीच काम केलं नाही.. म्हणून उमेदवारीलाही उशिर होत होता.. असा थेट आरोप नाशिकच्या भाजप कार्यकर्त्यांनी केलाय. नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसेंबद्दल उघड नाराजी आहे मात्र महायुतीचा धर्म पाळणारच असंही भाजप कार्यकर्त्यानं सांगितलंय..