Loksabha Election 2024 Live Updates: महाराष्ट्रात मविआ एकतर्फी, आम्ही 38 जागा जिंकणार- वडेट्टीवारांचा दावा

महाराष्ट्रात प्रचारसभांचा धुरळा उडालाय. कोणी उमेदवारी अर्ज दाखल करतय तर कोणी भव्य शक्तीप्रदर्शन करतंय. ही लोकसभेची निवडणूक असल्याने भारतामधील अनेक भागांमध्ये हे चित्र आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...

Loksabha Election 2024 Live Updates: महाराष्ट्रात मविआ एकतर्फी, आम्ही 38 जागा जिंकणार- वडेट्टीवारांचा दावा

Lok Sabha Elections Live Updates: महाराष्ट्रात प्रचारसभांचा धुरळा उडालाय. कोणी उमेदवारी अर्ज दाखल करतय तर कोणी भव्य शक्तीप्रदर्शन करतंय. ही लोकसभेची निवडणूक असल्याने भारतामधील अनेक भागांमध्ये हे चित्र आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...

5 May 2024, 13:33 वाजता

महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आव्हान त्यांच्यासमोर आहे यामुळेच पहाटेपासूनच नरेश मस्के हे प्रचारासाठी लोकांमध्ये जाताना पाहायला मिळतात ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट या ठिकाणी हॅप्पी स्ट्रीट येथील मॉर्निंग वॉक साठी आलेल्या नागरिकांची भेट घेत प्रचार केला.

5 May 2024, 12:06 वाजता

भाजपचेच इंजिन बिघडल्यामुळे त्यांना मनसेचं इंजिन सोबत घ्यावं लागलं अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. शरद पवारांच आणि उद्धव ठाकरे यांचं इंजिन सुसाट चाललं आहे. त्यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे की आपल्या 10 ते 15 तरी जागा निवडून येतात का? अशी टीका जयंत पाटीलानी साताऱ्यात केली आहे.

5 May 2024, 11:30 वाजता

विश्वजीत कदम वाघच आहेत आणि संजय राऊतांना वाघ बाहेर कसे शिकार करतो,हे कदाचित माहीत नसावं. त्यांनी एखाद्या चॅनलची डॉक्युमेंटरी बघावी. कारण वाघ संधी बघून झडप घालतो,असा टोला काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी राऊतांना लगावला आहे.

5 May 2024, 10:28 वाजता

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. हाय व्होल्टेज लढतीने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं आहे. महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर यांच्यात काट्याची लढत पहायला मिळतेय.

5 May 2024, 09:47 वाजता

भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल जाधव यांचा आज कार्यकर्ता संवाद मेळावा. नाशिकच्या सिडको परिसरात सायंकाळी होणार कार्यकर्ता मेळावा. नाशिक लोकसभा मतदार संघातून अनिल जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. भाजपकडून इच्छुक मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराज होत उतरले रिंगणात

5 May 2024, 08:31 वाजता

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघात प्रकरणी पंचनामे आणि तपासाचे काम पूर्ण झाले आहे. दिल्ली आणि मुंबई इथून आलेल्या तज्ञांच्या टीमने अपघातग्रस्त हेलिकॉप्टरची तपासणी केली. विमा कंपनीच्या क्लिअरन्स नंतर हेलिकॉप्टरचे अवशेष पुणे इथं पाठवण्यात आले.

5 May 2024, 07:34 वाजता

सांगली लोकसभेसाठी प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज दिवसभर प्रचारांचा धुरळा उडणार आहे, भाजप महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची मिरजेत संवाद  सभा पार पडणार आहे. त्याचबरोबर संजयकाकांच्या प्रचारार्थ सांगली शहरातून भव्य बाईक महारॅलीदेखील काढण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची विटा येथे सभा पार पडणार आहे.

5 May 2024, 07:18 वाजता

वंचितचा पक्ष वंचितांसाठी आहे की धनदांडग्यांसाठी ? असा प्रश्न निर्माण झालाय,असे विधान ओबीसी बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांनी केले आहे.तसेच धनदांडगे प्रतीक पाटील हे प्रकाश आंबेडकरांना भेटले आणि एका तासात काय घडलं,की त्यांनी विशाल पाटलांना आणि सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला,असा सवाल देखील उपस्थित करत प्रकाश आंबेडकरांनी,विशाल पाटील यांना दिलेल्या पाठिंबावर प्रश्न उपस्थित केला आहे.

5 May 2024, 07:06 वाजता

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावतील. शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांची तोफ रायगडमध्ये धडाडणार आहे. रायगड मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची सभा आज दुपारी अलिबाग इथल्या समुद्र किनारी असलेल्या मैदानावर होणार आहे. या सभेला शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेस नेते नसीम खान, भाई जगताप, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे उपस्थित राहणार आहेत.