पपईचा बिनकामाचा म्हणून फेकला जाणारा 'हा' भाग सर्वात महाग; आरोग्याच्या अनेक समस्यांवर ठरतो जालीम उपाय

Benefits Of Papaya Seeds : पपई आपल्यासा शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्याच्या बिया या वजन कमी करण्यापासून गॅस, आणि कोलेस्ट्रॉलवर रामबाण उपाय आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 6, 2024, 03:39 PM IST
पपईचा बिनकामाचा म्हणून फेकला जाणारा 'हा' भाग सर्वात महाग; आरोग्याच्या अनेक समस्यांवर ठरतो जालीम उपाय title=
Papaya Seeds Health Benefits Marathi Helpful in reducing obesity stomach gas and cholesterol

Papaya Seeds Health Benefits Marathi : फळं ही दररोज खाल्ली पाहिजे असं डॉक्टर आणि आहार तज्ज्ञ सांगतात. प्रत्येक फळ आपल्या निरोगा आरोग्यासाठी खाल्ली पाहिजे. आजकाल सर्व फळं बाजारात उपलब्ध असतात. ऋतूनुसार येणारी फळं खाल्लीच पाहिजे असं तज्ज्ञ सांगतात. घरोघरी फळं खाताना त्याचे बिया या फेकून देतो. पण या बियादेखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. (Papaya Seeds Health Benefits Marathi Helpful in reducing obesity stomach gas and cholesterol)

पपईतून आयरन, कॅल्शियम आणि मॅग्नीशियम मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतं. या पपईच्या बिया तुम्ही फेकून देत असाल तर आताच थांबा. कारण पपईच्या बिया या अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. 

पपईच्या बियांचे फायदे!

1. शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट

पपईच्या बियांमध्ये पॉलिफेनॉल, फ्लेव्होनॉइड्स, अल्कलॉइड्स, टॅनिन आणि सॅपोनिन्स भरपूर उपलब्ध असल्याने ते मजबूत अँटिऑक्सिडेंट ठरतं. अँटिऑक्सिडंट्स हे आपल्याला विविध रोगांपासून बचाव करतं.

2. निरोगी आतडे

पपईच्या बिया फायबरने समृद्ध असल्यामुळे ते आतड्यांच्या हालचालीसाठी चांगल असतं. त्यासोबत शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात मदत मिळते. 

हेसुद्धा वाचा - ब्लड प्रेशर झोपून की बसून कसं तपासायचं? डॉक्टरांकडून जाणून घ्या बीपी मोजण्याची योग्य पद्धत

3. वजन कमी करण्यास मदत करते

पपईच्या बिया फायबरने समृद्ध असल्याने ते पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते. वजन कमी करण्यास मदतगार ठरतं. 

4. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते

पपईच्या बियांमध्ये ओलेइक ऍसिड सारख्या मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् असतात. हे फॅटी ऍसिड खराब कोलेस्ट्रॉल (LDL कोलेस्ट्रॉल) कमी करून कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित मदत करतात. 

5. कर्करोग विरोधी गुणधर्म

पपईच्या बियांमध्ये पॉलीफेनॉल असतात जे शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असल्याने विविध कर्करोगापासून आपला बचाव होतो. बियांमधील आयसोथियोसायनेट कर्करोगाच्या पेशींच्या निर्मिती आणि विकासास आळा घालतो. 

6. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य राखते

बियामधील अँटिऑक्सिडंट्स आपल्याला मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात. त्याशिवाय रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. 

हेसुद्धा वाचा - वॉकिंग की पायऱ्या चढणं, वजन कमी करण्यासाठी कोणती एक्सरसाइज सर्वात बेस्ट?

7. जळजळ कमी करते

पपईच्या बिया जळजळ कमी करण्यासाठी गुणकारी आहे. पपईच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अल्कलॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलिफेनॉल असतं. ते जळजळ कमी करण्यास फायदेशीर ठरतं.  

8. मासिक पाळीच्या वेदना कमी करतं

पपईच्या बिया मासिक पाळीला चालना देण्यास आणि त्याची वारंवारता वाढविण्यास मदतगार ठरतं. मासिक पाळीच्या क्रॅम्प्सचे व्यवस्थापन करण्यास फायदेशीर ठरतं. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)