वजन कमी करण्यासाठी डाळ-भात परफेक्ट आहार; फायदे वाचून आत्ताच खायला लागाल

Health Tips In Marathi: डाळ-भात हे संपूर्ण अन्न आहे. तुम्हाला माहितीये का डाळ भात खावून तुम्ही वजनदेखील कमी करु शकता. कसं ते जाणून घ्या.

मानसी क्षीरसागर | Updated: May 1, 2024, 05:14 PM IST
वजन कमी करण्यासाठी डाळ-भात परफेक्ट आहार; फायदे वाचून आत्ताच खायला लागाल title=
from weight loss know amazing health benefits of dal chawal

Health Tips In Marathi: भारतीयांचे सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे डाळ-भात. आजारी असल्यावर किंवा जेवण बनवायचा कंटाळा आला की डाळ-भात आणि सोबतीला लोणचे इतक्या जेवणानेही पोट तृप्त होते. पण तुम्हाला माहितीये का डाळ-भात हे हेल्दी फूड आहे. ज्यांना वेट लॉस करायचे आहे त्यांच्यासाठी हेल्दी फूड आहे. कारण जे वेट लॉसचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या डाएटमध्ये डाळ-भाताचा समावेश नसतो. कारण लोक म्हणतात की, भात खाल्ल्याने वजन वाढते. मात्र हे खरं नाही. स्टीम राइस योग्य मात्रेत खाल्ल्यास वजन कधीच वाढत नाही. 

डाळ-भात खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डाळीत असलेले अँटी ऑक्सीडेंट आणि प्रोटीन असतात. भातात असलेले फायबर तुमचे वजन कमी करण्यास मदत करतात. वजन कमी करण्यासाठी डाळ-भात का खावा आणि त्याचे फायदे काय, जाणून घेऊया सविस्तर. 

प्रोटीन आणि कार्ब्सचे योग्य संतुलन 

डाळीचे सेवन हे शाकाहरी लोकांसाठी प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. सर्व प्रकारच्या डाळींमध्ये प्रोटीन असते. मात्र हाय प्रोटीनसाठी तुम्ही तूर, मूग किंवा चणा डाळीचा आहारात समावेश करु शकतात. प्रथिने मांसपेशियांच्या निर्माणासाठी आणि टिशूला रिपेअर करण्यास मदत करते. त्याचबरोबर स्टीम राइसमधूनही योग्य प्रमाणात कार्ब्स मिळतात. 

पोषक तत्वे

1 कप तांदळात 37 टक्के मॅगनीज, 17 टक्के सेलेनियम मिळते. त्याचबरोबर, 4 मोठे चमचे डाळीतून 12 टक्के मॅगनीज, 8 टक्के आयर्न आणि 20 टक्के फोलेट मिळते. डाळ आणि भात या दोघांमध्ये बी कॉम्पलेक्स व्हिटॅमिनचा एक चांगला स्त्रोत आहे. 

पचनास हलके

डाळ आणि भात या दोघांमध्ये फायबरचे प्रमाण योग्य असते. त्यामुळं दोन्हींचे मिश्रण करुन खाल्ल्यास बद्धकोष्ठची समस्या दूर होते. त्याचबरोबर डाळीला फोडणी देणाऱ्या जिन्नसात हिंग आणि जीरे हे मेटाबॉलिज्म वाढवणारे गुण आहेत. 

प्रोटीनचा चांगला स्त्रोत

डाळीत अनेक आवश्यक अमिनो अॅसिड असतात. जे फक्त जेवणातूनच प्राप्त करु शकतात. डाळ-भात हे संपूर्ण भोजन आहे. ज्यातून अधिक प्रमाणात अमिनो अॅसिड प्राप्त होते. 

क्रेव्हिंग कंट्रोल करते

फायबर आणि प्रोटिनने युक्त असल्यामुळं डाळ-भात खाल्ल्याने दीर्घकाळापर्यंत पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळं एक्स्ट्रा कॅलरी जेवणातून जात नाहीत. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)