समांथानं शेअर केला 'तो' आक्षेपार्ह फोटो, चूक कळताच केला डीलिट! फेक पोस्ट पाहून संतापले चाहते

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूच्या त्या फोटोवरून सोशल मीडियावर चर्चा... फेक फोटो पाहून संतापले चाहते

दिक्षा पाटील | Updated: May 6, 2024, 10:37 AM IST
समांथानं शेअर केला 'तो' आक्षेपार्ह फोटो, चूक कळताच केला डीलिट! फेक पोस्ट पाहून संतापले चाहते title=
(Photo Credit : Social Media)

Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. समांथानं फक्त दाक्षिणात्य नाही तर बॉलिवूडमध्ये देखील तिची छाप सोडली आहे. समांथा ही नेहमीच तिच्या प्रोजेक्ट्ससोबत तिच्या खासगी आयुष्याला घेऊन चर्चेत असते. आता समांथा ही मायोसाइटिस नावाच्या आजारावर मात देऊन हळू-हळू रिकव्हर होत असल्याचे दिसत आहे. त्यासाठी समांथाना सौना बाथ घेतलं आणि त्यासोबत तिनं त्याचे फायदे देखील सांगितले. पण या दरम्यान, काही नेटकऱ्यांनी दावा केला की समांथानं तिचा आक्षेपार्ह फोटो शेअर केला आणि काही काळातच तिनं तो फोटो डिलीट केला. सध्या तिचा बाथटबमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी तो फेक असल्याचे म्हणत आहेत. 

समांथानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून 'फार इन्फ्रारेड सौना' घेतानाचा फोटो शेअर केला आणि त्यात कॅप्शन दिलं की सतत उपचार आणि रिकव्हरीसाठी वेगवेगळ्या ऑपशनचा शोध घेते. त्यानंतर त्याचे फायदे सांगत ती म्हणाली स्नायूंमध्ये रक्ताभिसरण सुधारतं, शरीरातील चरबी कमी होते, ऊर्जा वाढते, शरीर डिटॉक्स होतं, सेल्युलाईट कमी होतं, त्वचा टवटवीत होतं, घाम येणे वाढतं, सांधेदुखी कमी होते आणि लवचिकता वाढते'. 

samantha ruth prabhu fans got angry as her fake Bathtub Photo went viral

समांथानं तिच्या हेल्थला घेऊन केलेल्या या पोस्टवरून नेटकरी म्हणत आहेत की समांथानं आधी एक आक्षेपार्ह फोटो शेअर केला होता. तो काळात तिनं डिलीट केला. दरम्यान, तिच्या चाहत्यांनी हा फेक फोटो असल्याचं सांगितलं आणि फेक फोटो शेअर करणाऱ्या नेटकऱ्यांना ट्रोल केलं. समांथाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तिनं सध्या ब्रेक घेतला असून ती तिच्या आरोग्यावर लक्ष देत आहे. दरम्यान, यातून आता ती ठीक होत असल्यानं ती लवकरच कमबॅक करेल अशी चाहत्यांना आशा आहे. तर तिची सिटाडेल हनी बनी ही सीरिज प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. त्यात तिच्यासोबत वरुण धवन दिसणार आहे. 

हेही वाचा : गर्दी जमवण्यासाठी दादा कोंडकेंना आणलं.... पण नंतर जे घडलं ते पाहून नारायण राणेंना फुटला घाम

दरम्यान, काही दिवसांपूर्वी समांथाचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात त्यानं खुलासा केला की त्यानं रिलेशनशिपमध्ये असताना चीटिंग केली आहे. त्यानं टू-टायमिंग केलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समांथाच्या चाहत्यांनी दावा केला की नागा चैतन्यनं तिला लग्नानंतर धोका दिला आहे.