टी-20 वर्ल्ड कप जिंकणार कोण? सौरव गांगुलीची मोठी भविष्यवाणी

क्रिकेटचा महाकुंभ

आयपीएलनंतर टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या महाकुंभाला सुरूवात होणार आहे. एकूण 20 संघांनी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सहभाग नोंदवला आहे.

एकूण 55 सामने

अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमानाने खेळला जाणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये एकूण 55 सामने होणार आहेत.

तगडी फाईट

युगांडापासून इंग्लंडपर्यंत अशा 20 संघात तगडी फाईट पहायला मिळणार आहे. मात्र, अंतिम विजेता कोण असणार? यावर आता अंदाज लावले जात आहेत.

प्रमुख दावेदार कोण?

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचे प्रमुख दावेदार कोण? असा सवाल पत्रकारांनी सौरव गांगुलीला विचारला होता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया

त्यावर उत्तर देताना सौरव गांगुलीने इंग्लंड किंवा पाकिस्तानचं नाव न घेता भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांचं नाव घेतलं.

सर्वोत्तम संघ

मला वाटतं की सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघ सर्वोत्तम संघ आहेत. मला विश्वास आहे की ते उत्तम प्रदर्शन करतील, असं गांगुली म्हणतो.

VIEW ALL

Read Next Story