T20 world Cup 2024 : टीम इंडियामध्ये एकही ऑफ-स्पिनर का नाही? शब्दही न काढता रोहित शर्माचं भन्नाट उत्तर

Rohit Sharma On off-spinner in squad : टीम इंडियामध्ये 4 स्पिनर घेतले असताना एकाही ऑफ स्पिनरला संधी का देण्यात आली नाही? असा सवाल विचारल्यावर रोहित काय म्हणाला? पाहा

सौरभ तळेकर | Updated: May 3, 2024, 04:23 PM IST
T20 world Cup 2024 : टीम इंडियामध्ये एकही ऑफ-स्पिनर का नाही? शब्दही न काढता रोहित शर्माचं भन्नाट उत्तर title=
Rohit Sharma unique Reply on no off-spinner in the squad For t20 world Cup 2024

T20 world Cup 2024 : आगामी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली बीसीसीआयने 15 खेळाडूंची निवड केली गेली. यामध्ये केएल राहुल याला डच्चू देण्यात आलाय. तर युझी चहल, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांचं कमबॅक झालं आहे. टीम इंडियाने रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल या चार क्वालिटी फिरकीपटूंना संधी दिली आहे. मात्र, टीम इंडियामध्ये एकही ऑफ स्पिनर (Off-spinner in squad) नसल्याने आता अनेक प्रश्न विचारण्यात येत आहे. अशातच रोहित शर्मा आणि अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरेन्समध्ये रोहित शर्माने यावर भन्नाट उत्तर दिलं. 

झालं असं की, टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी (T20 world Cup 2024) संघाची निवड झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तरं दिली. त्यावेळी त्यांनी टीम इंडियाची (Team India) निवड नेमकी कशी झाली? यावर खुलासा केला. कोणत्या खेळाडूंना का संधी दिली गेली? आणि संघात निवड न झालेल्या खेळाडूंना का घेतलं नाही? याची समाधानकारक उत्तरं दोघांकडून देण्यात आली होती. प्रश्नउत्तरांचा कार्यक्रम सुरू असताना एका पत्रकाराने रोहित शर्माला ऑफ स्पिनरविषयी प्रश्न केला.

टीम इंडियामध्ये जडेजा, अक्षर, चहल आणि कुलदीप आहे, पण एकही ऑफ स्पिनर का नाहीये? असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा रोहित शर्माने शब्दात उत्तर न देता फक्त हात वर केला अन् स्वत:कडे बोट दाखवलं. जणू काही... मी आहे ना... असं रोहित शर्माने स्पष्ट केलंय. रोहितच्या युनिक रिप्लायवर पत्रकार परिषदेत हसू पिकलं. आमच्याकडे 4 क्वालिटी स्पिनर्स आहेत. अमेरिकेत अंदाजे सकाळी 10 ते 10.30 ला सामने सुरू होतील, त्यामुळे खेळपट्टी मोकळी असेल. त्याचा फायदा स्पिनर्सला होऊ शकतो, असं रोहित शर्माने यावेळी स्पष्ट केलं.

टी-20 वर्ल्डकपसाठी कशी आहे टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन (विकेटकीपर), मोहम्मद सिराज.

रिझर्व खेळाडू - शुभमन गिल, खलिल अहमद, आवेश खान, रिंकू सिंग.