IPL 2024 : CSK च्या संघाला चांगलच चोपलं! मार्कस स्टॉयनिसनं मोडला सेहवागचा 'हा' रेकॉर्ड

CSK vs LSG IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 39 व्या सामन्यात लखनऊ सुपर जाएंयट्सने, बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सला त्यांचा गड मानल्या जाणाऱ्या चेपॉकच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. सामन्याचा हिरो ठरलेला लखनऊचा मार्कस स्टॉयनिसने खेळलेल्या ताबडतोब इनिंगमुळे भारतीय क्रिकेटचे दिग्गज खेळाडू विरेंद्र सेहवाग आणि पॉल वाल्थाटी यांचा रेकॉर्ड तोडला आहे.

Updated: Apr 24, 2024, 08:54 PM IST
IPL 2024 : CSK च्या संघाला चांगलच चोपलं! मार्कस स्टॉयनिसनं मोडला सेहवागचा 'हा' रेकॉर्ड title=

Marcus Stoinis inning, IPL 2024 : सीएसकेचे होमग्राउंड असलेल्या चेपॉकच्या मैदानावर  (MA Chidambaram stadium) के एल राहूलच्या लखनऊ सुपर जाएंट्सने, ऋतुराजच्या नेतृत्वाखाली खेळणारी चेन्नई सुपर किंग्सचा एका रोमांचक सामन्यात पराभव केला आहे. मार्कस स्टॉयनिसच्या 124 धावांच्या नाबाद खेळीमुळं लखनऊने आयपीएलच्या या हंगामात चेन्नईला सलग दुसऱ्यांदा पराभूत केलं आहे. या सामन्याची विशेष गोष्ट म्हणजे आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला  चेपॉकच्या मैदानावर एकदाही पराभवाचा सामना केलेला नव्हता, पण 39 व्या सामन्यात लखनऊने हा विशेष कारनामा करून दाखवला आहे. या सामन्याचा खरा हिरो ठरलेला मार्कस स्टॉयनिसने आपल्या फलंदाजीने सीएसकेच्या गोलंदाजांसाठी चेन्नईचे मैदान जणू काही नकोसे झाले होते.

लखनऊच्या नावावर हा रेकॉर्ड

चेन्नई सुपर किंग्सने पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडच्या शतकीय खेळीमुळे लखनऊला 211 धावांचे आव्हान दिले होते. पण लखनऊ सुपर जाएंट्सने हे आव्हान 20 व्या ओव्हरचे 3 बॉल बाकी ठेवतच पार केले. तर याविजयामुळे LSG चेपॉकच्या मैदानावर 200 पेक्षा जास्त रन चेस करणारी तिसरी टीम बनली आहे. याआधी 2012 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 206 आणि 2018 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने 203 धावांच्या लक्षाचा पिछा करत सामना जिंकला होता आणि पंजाब किंग्सने आयपीएल 2023 मध्ये चेन्नईविरूदध याच मैदानावर 201 धावांचे लक्ष चेस केले होते. तर आता चेपॉकच्या मैदानावर लखनऊ सुपर जाएंट्स सर्वात जास्त 211 धावांचा पाठलाग करून जिंकणारी पहिली टीम बनली आहे. 

स्टॉयनिसने मोडला 13 वर्ष जूना रेकॉर्ड

मार्कस स्टॉयनिसने, चेन्नईविरूद्ध 124 धावांची नाबाद खेळी खेळत संघाला एकतर्फी विजय मिळवुन दिला आहे. तर स्टॉयनिसने रन चेस करताना आयपीएलच्या इतिहासामधील सर्वात मोठा स्कोर बनवला आहे. याआधी हा रेकॉर्ड पंजाब किंग्सचा दिग्गज खेळाडू पॉल वाल्थाटी याचा रेकॉर्ड तोडला आहे. वाल्थाटीने चेन्नईविरूद्धच आयपीएल 2011 मध्ये 120 धावांची नाबाद खेळी खेळली होती, तर याच वर्षी विरेंद्र सेहवागने पण डेक्कन चार्जर्सविरूद्ध 119 धावांची खेळी खेळून सामना आपल्या नावावर केला होता.  

विरेंद्र सहवागचा रेकॉर्ड पण संपुष्टात

मार्कस स्टॉयनिसने, चेन्नईविरूद्ध 124 धावांची नाबाद खेळी खेळत आयपीएलमधील धाकड फलंदाज विरेंद्र सेहवाग याचा 10 वर्ष जूना रेकॉर्ड मोडला आहे. मार्कस स्टॉयनिसच्या शतकीय खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध सर्वात मोठा वैयक्तिक स्कोर करण्याचा रेकॉर्ड आता विरेंद्र सेहवागच्या नावावर नसून, लखनऊचा उत्कृष्ट ऑलराऊंडर मार्कस स्टॉयनिसच्या नावावर बदली झाला आहे. विरेंद्र सेहवागने 2014 मध्ये खेळल्या गेलेल्या क्वॉलिफायर-2 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध 122 धावांची खेळी खेळली होती.