महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक किल्ला; सह्याद्रीतील कुलंग गड सर करताना ट्रेकर्सना देखील धडकी भरते

कुलंग गड हा धोकादायक चढाई असलेल्या यादीतील एक किल्ला आहे. जाणून घेऊया या किल्ल्यावर जायचे कसे? 

| May 04, 2024, 22:41 PM IST

kulang fort : सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील किल्ले दुर्गम असून यांची चढाई चढणाऱ्याचा कस काढणारी आहे. या पैकीच एक आहे तो नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कुलंग गड.  हा सर्वात कठीण चढाई असलेला किल्ला आहे. कलंग गडावरुन  अलंग आणि मदन हे किल्ले दिसतात. 

1/7

सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील कळसूबाई हे सर्वोच्च शिखर आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील सर्वात धोकादायक आहे तो कुलंग गड.

2/7

सन 1672 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पेशवा मोरोपंत यांनी हा किल्ला जिंकला. गडावर जाण्यासाठी दगडातून कोरलेल्या जिने आहेत. गडावर कातळात कोरलेल्या तीन गुहा आहेत. 

3/7

कुलंगगडावर पोहोचण्यासाठी प्रथम खालच्या पठारावर पोहोचावे लागते. पठारावर पोहोचण्यासाठी कुरंगवाडीतून दोन तासांची पायपीट करावी लागते. 

4/7

अलंग, मदन, कुलंगगड हे दुर्गत्रिकूट चढायला सर्वात कठीण आहे. यातील कुलंगगडावर फक्त पायी चढाई करता येते. मात्र, हा ट्रेक अतिशय धोकादायक आहे. 

5/7

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग कसारा घाटातून पुढे गेल्यावर इगतपुरी येथून  कुलंगगडावर जाता येते. घोटीहून  10 किमी वर कळसुथे नावाचे गाव आहे.   

6/7

कुलंगगड सह्याद्रीतल्या सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या अलंग, मदन व कुलंग मधला एक गड आहे. समुद्रसपाटीपासून हा गड 4822 फूट उंचीवर आहे. 

7/7

कळसूबाई शिखराच्या पश्चिमेला कुलंग किल्ला आहे. कळसूबाई शिखराच्या रांगते असलेला कुलंग गड सर करताना हात पाय थरथरतात.