Lok Sabha Election 2024 LIVE: धाराशिवमध्ये काँग्रेसला बसणार मोठा धक्का? या बड्या नेत्याची पवारांच्या सभेला अनुपस्थिती

Lok Sabha Election 2024 LIVE Updates : प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बड्या नेत्यांच्या सभांची गर्दी... पाहा कोणत्या नेत्याची कुठं असेल सभा... राज्याच्या राजकारणात आजचा दिवस नेमकं कोण गाजवणार...  

Lok Sabha Election 2024 LIVE:  धाराशिवमध्ये काँग्रेसला बसणार मोठा धक्का? या बड्या नेत्याची पवारांच्या सभेला अनुपस्थिती

Lok Sabha Election 2024 LIVE Updates : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीपूर्वीच्या प्रचारतोफा आज, बुधवारी थंडावणार आहेत. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी हातात असणाऱ्य़ा अखेरच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंक पोहोचण्यासाठी म्हणून राज्यात अनेक ठिकाणी प्रचारसभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 8 मतदारसंघांसह देशातील 89 जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. या टप्प्यात 26 एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी इथं मतदान होणार आहे. या मतदानापूर्वी राष्ट्रीय नेत्यांनी महाराष्ट्र गाठला आहे. 

24 Apr 2024, 10:23 वाजता

Lok Sabha Election 2024 LIVE Updates : राहुल गांधी आज कॉंग्रेसच्या न्यायपत्रावर संवाद साधणार

समृद्ध भारत फाउंडेशनच्या वतीन सामाजिक न्याय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीच्या जवाहर भवन या ठिकाणी असलेल्या संमेलनाच्या पहिल्या सत्राची सुरुवात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या संमेलनात काँग्रेसचे अनेक नेते चर्चा करणार आहेत. देशभरातील OBC, SC, ST यांच्या विविध प्रश्नांवर या संमेलनात चर्चा होणार आहे. 

काँग्रेसचा जाहीरनाम्याला न्यायपत्र असं नाव देण्यात आलं आहे. या न्यायपत्रात सामाजिक न्यायाच्या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. सामाजिक न्यायासाठी जातनिहाय  जणगणने सोबतच अनेक आश्वासन देण्यात आली आहेत. या सर्व विषयावर या सामाजिक न्याय संमेलनात विविध सत्रात चर्चा होणार आहे. 

24 Apr 2024, 09:41 वाजता

Lok Sabha Election 2024 LIVE Updates : सुनील तटकरेंकडून शरद पवारां बाबत मोठा गौप्यस्फोट

सुनील तटकरेंकडून शरद पवारां बाबत मोठा गौप्यस्फोट. 2016 मध्ये भाजप सोबत सत्ता स्थापनेचा आदेश देण्यात आला. मंत्रीपदं ठरली, खाते वाटपही झाले होते, लोकसभेच्या जागाही ठरल्या होत्या. त्या काळात अमित शहां सोबत दिल्लीत बैठक झाली आणि त्या बैठकीला साहेबही उपस्थित होते अशा खळबळजनक गौप्यस्फोट तटकरेंनी केला. 

24 Apr 2024, 09:11 वाजता

Lok Sabha Election 2024 LIVE Updates : पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वत: शरद पवार मैदानात 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वत: शरद पवार मैदानात उतरलेत. वयाचा विचार न करता लागोपाठ ते उममेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतायत. आज शरद पवारांच्या माढा लोकसभा मतदारसंघात सभा होतेय. उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांची मोडनिंब इथे जाहीर सभा होणारेय. सभनंतर शरद पवार संत सावता माळी यांच्या समाधीचे अरण इथे जाऊन दर्शन घेणार आहेत. 

 

24 Apr 2024, 09:02 वाजता

Lok Sabha Election 2024 LIVE Updates : हिंदू-मुस्लीम दंगल घडू शकते- बच्चू कडू 

अमरावतीत हिंदू-मुस्लीम दंगल घडू शकते असा खळबळजनक दावा बच्चू कडूंनी केला आहे. 26 तारखेपर्यंत निवडणुकीत काहीही होऊ शकतं असं कडूंनी म्हणत, त्यामुळेच आम्ही एक पाऊल मागे घेतलं असा दावाही केला. गृहमंत्र्यांनीच कायदा तोडला, त्यांनी सभा घ्यायला नको होती... या सर्व घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा फोन आला. मात्र, मी त्यांचा उचलणार नाही असं कडूंनी म्हटलं आहे. 

24 Apr 2024, 08:43 वाजता

Lok Sabha Election 2024 LIVE Updates : देवाच्या यात्रेत पवार एकत्र... 

राजकारणामुळे कौटुंबिक दुरावा आला असला तरीही हिंजवडीतल्या म्हतोबा यात्रेत पार्थ पवार आणि रोहित पवार एकाच बगाड्यावर दिसले. इतकंच नाही तर देवाच्या बगाड्यावर चढताना रोहित पवारांना पार्थ पवारांनी हातही दिला. गर्दी असल्यामुळे दोघेंही जण एकमेकांना आधार देत होते. पक्ष फुटीनंतर दोन्ही भावांची अशी एकत्र भेट चर्चेचा विषय ठरतेय. 

24 Apr 2024, 08:31 वाजता

Lok Sabha Election 2024 LIVE Updates : सुनेत्रा पवार यांना क्लिनचिट

महाराष्ट्र शिखर बॅक घोटाळ्याप्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार सुनेत्रा पवार यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लिन चिट दिली आहे.

 

24 Apr 2024, 08:29 वाजता

Lok Sabha Election 2024 LIVE Updates : चौथ्या टप्प्यातील अर्ज भरण्यासाठी आता उमेदवारांची लगबग 

चौथ्या टप्प्यातील अर्ज भरण्यासाठी आता उमेदवारांची लगबग दिसून येतेय. मराठवाड्यातील हायहोल्टेज सीट असलेल्या बीड मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. मोठं शक्तिप्रदर्शन करत त्या अर्ज भरतील. जालन्याचे मविआचे उमेदवार कल्याण काळे हे सुद्धा आज उमेदावारी अर्ज दाखल करणार आहेत. तर संभाजीनगरमध्ये MIMचे उमेदवार इम्तियाज जलली रॅली काढून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.. शिर्डीतही उत्कर्षा रुपवते वंचित कडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील यावेळी वंचितकडून भव्य रॅली काढण्यात येणार असून सुजात आंबेडकर रॅलीत उपस्थीत असतील. तर जळगावात मविआचे उमेदवार करण पवार आणि रावेरचे श्रीराम पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत संजय राऊत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह मविआचे नेते सोबत असतील.

 

24 Apr 2024, 08:27 वाजता

Lok Sabha Election 2024 LIVE Updates : जितक्या जास्त धमक्या येतील तितका... 

जितक्या जास्त धमक्या येतील तितका जास्त लीड सुप्रिया सुळेंना मिळणार असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केलाय. बारामतीत काही कार्यकर्त्यांना धमकीचे फोन येतायत. मात्र, काहीही करू नका आम्ही काय उत्तर द्यायचंय ते दिलंय. असं रोहित पवारांनी म्हटलंय.

 

24 Apr 2024, 08:25 वाजता

Lok Sabha Election 2024 LIVE Updates : अमरावतीत आज अमित शाह आणि राहुल गांधींची सभा 

अमरावतीत आज अमित शाहा आणि राहुल गांधींची सभा होणार आहे. दुस-या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारासाठी अमित शाहांची सभा होतेय. अमरावतीच्या सायन्स स्कोर मैदानावर दुपारी 12 वाजता सभा होणाराय. तर याच मैदानावर बच्चू कडू हे सुद्धा सभा घेण्यासाठी ठाम आहेत. तर दुसरीकडे मविआच्या बळवंत वानखडेंसाठी राहुल गांधींची परतवाडामध्ये सभा होणार आहे.

 

24 Apr 2024, 08:04 वाजता

Lok Sabha Election 2024 LIVE Updates : दिग्गज नेत्यांच्या आज राज्यात सभा 

दिग्गज नेत्यांच्या आज राज्यात सभा होतायत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारासाठी सभा होतेय. काँग्रेस नेते राहुल गांधीही आज अमरावतीत मविआ उमेदवार बळवंत वानखेडेंच्या प्रचारासाठी सभा घेणारेत. सोलापुरात प्रणिती शिंदेंसाठीही ते आज सभा घेतायत. शरद पवार आज माढामध्ये असणार आहेत. धैर्यशील मोहिते पाटलांसाठी ते मैदानात उतरले असून, उद्धव ठाकरेंची हिंगोलीच्या हादगावमध्ये नागेश आष्टीकरांसाठी सभा होईल. तर नांदेडमध्ये मविआ उमेदवार वसंतराव चव्हाणांसाठी पत्रकार परिषद घेणारेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रामदास तडस यांच्या प्रचारासाठी वर्ध्यात सभा होतेय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हिंगोलीतील शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कोहळीकरांसाठी सभा होणार आहे.