Watermelon Vs Melon : टरबूज की खरबूज? उन्हाळ्यात कोणतं फळ जास्त hydrating?

Watermelon vs Muskmelon :  उन्हाळ्याचा झळा दिवसेंदिवस वाढत आहे. अशात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी आणि फळ खाण्यावर भर द्यावं असं तज्ज्ञ सांगतात. मग उन्हाळ्यात टरबूज की खरबूज कुठलं फळं जास्त चांगल आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडलाय. 

नेहा चौधरी | Updated: Apr 24, 2024, 10:05 AM IST
Watermelon Vs Melon : टरबूज की खरबूज? उन्हाळ्यात कोणतं फळ जास्त hydrating? title=
Watermelon or Melon Which fruit is more hydrating in summer

Watermelon vs Muskmelon : उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. जी लोक कामासाठी बाहेर जातात त्यांना उष्णतेपासून शरीराचा बचाव करण्यासाठी तज्ज्ञ पाणी पिण्यावर सर्वाधिक भर द्यायला सांगतात. बॉडी हायड्रेटेड राहणे उन्हाळ्यात अतिशय गरजेचे आहे. उन्हाळे आपल्या शरीरातून घाम येतो आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे आपली प्रकृती खराब होण्याची भीती असते. (Watermelon or Melon Which fruit is more hydrating in summer)

अशामध्ये तज्ज्ञ उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी आणि फळं खाण्याचा सल्ला देतात. फळांमध्ये कलिंगड हे सर्वाधिक पाणीदार फळ आहे. त्याशिवाय टरबूज आणि संत्री यातूनही आपल्या शरीराला पाणी मिळतं. मग उन्हाळ्यात टरबूज की खरबूज नेमकं कुठलं फळं जास्त फायदेशीर आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना अनेक वेळा पडतो. आज तुमच्या या प्रश्नाच उत्तर देणार आहोत. 

टरबूज आणि खरबूजमध्ये कुठले पोषक तत्व?

सर्वात आधी आपण टरबूज आणि खरबूजमध्ये  कुठले पोषक तत्त्व असतात ते जाणून घेऊयात. 

खरबूज - फायबर, प्रथिने, कार्ब्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए आणि के, फोलेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम 
टरबूज - फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी1, बी5 आणि बी6, लोह, नियासिन, लाइकोपीन 

टरबूज खाण्याचे फायदे 

टरबूज हृदयासाठी फायदेशीर 

दृष्टी सुधारते

किडनीचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत

कलिंगड खाण्याचे फायदे

डिहायड्रेशनपासून दूर ठेवण्यास मदत

वजन कमी होते

हृदयासाठी फायदेशीर

पचनशक्ती मजबूत करण्यास मदत

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

रक्तदाब नियंत्रणात ठेवते

उन्हाळ्यात कोणते जास्त हायड्रेटिंग आहे?

टरबूज विरुद्ध खरबूज यात नेमकं कोणतही फळ बाजी मारत नाही. दोन्ही फळं उन्हाळ्यात आपल्याला फायदेशीर आहेत. टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण थोडे जास्त असतं, तर खरबूजमध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. हे दोन्ही फळं उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. 

टरबूज आणि कलिंगड एकत्र खाल्यास?

टरबूज आणि कलिंगड दोन्ही गोड फळं असून दोन्हीमध्ये चांगले पाणी आहे. त्यामुळे या दोन्ही फळांचं एकत्र सेवन केल्यास काही हरकत नाही असं तज्ज्ञ सांगतात. 

ही गोष्ट टाळा!

तुम्ही सकाळी किंवा दिवसा दोन्ही फळं एकत्र खाऊ शकता मात्र रात्रीच्या वेळी ही फळं खाणे टाळा. कारण या दोन्हीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते पचण्यास जड असतं. त्याशिवाय हे दोन्ही फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी, दूध किंवा लस्सी पिऊ नका. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)